वाहनांना 'एचएसआरपी' नंबर प्लेट बंधनकारक; अन्यथा कामे होणार नाहीत
नंदुरबार, 02 जुलै (हिं.स.) शासनाने राज्यातील वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिनांक 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी म्हणजेच ''एचएसआरपी'' (High Security Registration Plate - HSRP) बसवणे
वाहनांना 'एचएसआरपी' नंबर प्लेट बंधनकारक; अन्यथा कामे होणार नाहीत


नंदुरबार, 02 जुलै (हिं.स.) शासनाने राज्यातील वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून दिनांक 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी

झालेल्या सर्व जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी म्हणजेच 'एचएसआरपी' (High Security

Registration Plate - HSRP) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही नंबर प्लेट बसवण्यासाठी 30

जून 2026 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली होती, वाहनांवर ‘एचएसआरपी’ नंबर प्लेट नसल्यास

परिवहन कार्यालयातील वाहनविषयक महत्त्वाची कामे केली जाणार नाहीत, अशी माहिती सहाय्यक

प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलवडे यांनी दिली आहे.

वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट बसविल्याशिवाय परिवहन कार्यालयातील (RTO) खालील महत्त्वाची

कामे केली जाणार नाहीत:

वाहन हस्तांतरण (Transfer of Ownership)

नोंदणी प्रमाणपत्रामध्ये (RC) पत्ता बदल करणे

फायनान्स बोजा चढविणे किंवा उतरविणे

दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र (Duplicate RC) मिळवणे

ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) जारी करणे

वाहनामध्ये कोणताही बदल करणे

परवाना नूतनीकरण (Permit Renewal) करणे

जुन्या परिवहन वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण व परवानाविषयक कामकाज, तसेच खाजगी

वाहनांचे नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरण कामकाज यातून वगळण्यात आले आहे.

दंडात्मक कारवाई!

ज्या वाहनधारकांनी 30 जून 2026 या अंतिम मुदतीपर्यंत आपल्या वाहनांवर एचएसआरपी नंबर प्लेट

बसवून घेतली नाही, अशा वाहनांवर 01 जुलै 2026 पासून कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल,

असेही सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलवडे यांनी कळविले

आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande