नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल
नाशिक, 02 जुलै (हिं.स.)।नाशिक महिलेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यासोबतच तिच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सरकारवाडा
नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; गुन्हा दाखल


नाशिक, 02 जुलै (हिं.स.)।नाशिक महिलेसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करण्यासोबतच तिच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एका इसमाविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सरकारवाडा पोलीस ठाण्यात रियाज बुराउद्दीन शेख (वय ४०, रा. संजीवनीनगर, अंबड) याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संशयित रियाज हा फळविक्रेता आहे आणि पीडिता आरके परिसरात राहते. रियाजने पीडितेशी ओळख निर्माण केली. नंतर पीडितेसोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने पीडितेस स्वतःविषयी खोटी माहिती देत तिचा विश्वास संपादन केला. रियाजने तिला लग्नाचे आमिष दाखवून दूधबाजार, संजीवनी नगर परिसरात वेळोवेळी अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

इगतपुरी येथील एका धार्मिक स्थळावर नेत तेथे ग्लासमध्ये गुलाब जल असल्याचे सांगून ते पाणी पिण्यास दिले. त्यानंतर रियाजने त्याच्या घरी नेत धर्मग्रंथाचे पठण जबरदस्तीने ऐकायला भाग पाडून, जबरदस्तीने धर्मग्रंथ वाचण्यास सांगितले, पीडितेने त्यास नकार दिला असता, त्याने तिच्याशी वाद घातले. त्याचप्रमाणे पीडितेला कपाळावर टिकली लावण्यास मनाई करून, तिच्या धार्मिक भावना दुखावत शारीरिक संबंध ठेवले, असे फिर्यादीत नमुद आहे. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने सरकारवाडा पोलिसांकडे धाव घेत आपबिती सांगितली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सरकारवाडा पोलिस करीत आहेत.

टीसीएस प्रकरणानंतर नाशिक मध्ये हा दुसरा धर्मांतराचा प्रकार समोर आला असून याबाबत प्रशासन काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande