
रत्नागिरी, 02 जुलै (हिं.स.)। अशोक लेलँड या हिंदुजा ग्रुपची भारतातील प्रमुख कंपनी आणि देशातील आघाडीच्या व्यावसायिक वाहन निर्माता कंपनीने आज रत्नागिरी येथे लाइट कमर्शियल वेईकल्ससाठी आपल्या नवीन डीलरशिपचे उद्घाटन केले. महाराष्ट्रातील ही १६वी एलसीव्ही डीलरशिप आहे, यामुळे कंपनीचे एलसीव्ही वितरण नेटवर्क अधिक मजबूत झाले आहे, जिथे आता देशभरात ९५० पेक्षा जास्त कस्टमर टचपॉइंट्स आहेत.
नवीन चॅनेल पार्टनर लवेकर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडची ही ३एस (सेल्स, सर्व्हिस आणि स्पेअर्स) सुविधा रत्नागिरीतील महानगर सीएनजी पंपाजवळ मोक्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांना उत्तम अनुभव मिळावा यासाठी या अत्याधुनिक सुविधेत ८ क्विक सर्व्हिस बे आणि प्रगत पायाभूत सुविधा देण्यात आली आहे. कंपनी सध्या एलसीव्ही श्रेणीत साथी, दोस्त, बडा दोस्त, पार्टनर आणि मित्र ही उत्पादने ऑफर करते.
अशोक लेलँड लिमिटेडच्या एलसीव्ही बिझनेसचे हेड श्री. विप्लव शाह म्हणाले, महाराष्ट्र आमच्यासाठी नेहमी महत्त्वाची बाजारपेठ राहिली आहे आणि या भागात आमचे स्थान अधिक दृढ करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. ग्राहकांसोबत आमचे नाते विश्वास, कामगिरी आणि सामायिक प्रगतीवर टिकून आहे. आमची उत्पादने त्यांच्या उत्कृष्ट मायलेज, विश्वासार्हता आणि दर्जेदार कामगिरीसाठी ओळखली जातात. प्रबळ नेटवर्क आणि उद्योगातील आघाडीच्या सर्व्हिस रिटेंशनसह ग्राहक आमच्यावर सातत्याने विश्वास दाखवतात त्याचा आम्हाला अभिमान आहे. या नवीन डीलरशिपची सुरुवात म्हणजे आमच्या मौल्यवान ग्राहकांना जागतिक दर्जाची उत्पादने आणि अतुलनीय सेवा देण्याच्या आमच्या कटिबद्धतेच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे.
अशोक लेलँडने भारतातील एलसीव्ही ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपली उत्पादने बाजारपेठेत सादर केली, ज्यामध्ये किफायतशीर किमतीत सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा मेळ घालण्यात आला आहे. आज संपूर्ण भारतात ६ लाखांपेक्षा जास्त एलसीव्ही कार्यरत आहेत, जे या क्षेत्रातील आमचे मजबूत स्थान दर्शवतात. आमच्या पोर्टफोलिओचा विस्तार करत आम्ही नुकतेच अशोक लेलँड साथी या प्रीमियम एंट्री-लेव्हल एससीव्हीच्या लाँचसह २-टन पेक्षा कमी वजनाच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. न्यू-जनरेशन ४५ एचपी इंजिनद्वारे समर्थित असलेले साथी ११० एनएम टॉर्क निर्माण करते आणि या श्रेणीतील सर्वात मोठे लोडिंग क्षेत्र, तसेच उद्योगात आघाडीची असलेली १,१२० किलोग्रॅमची पेलोड क्षमता प्रदान करते. एंट्री-लेव्हल स्मॉल कमर्शियल वेईकल बाजारपेठेला नवी व्याख्या देण्यासाठी डिझाइन केलेले साथी उद्योगात गेम चेंजर ठरले आहे.
बडा दोस्त हे पूर्णपणे नवीन आणि मजबूत एलसीव्ही प्लॅटफॉर्मवर तयार केलेले पहिले उत्पादन आहे आणि याचे आय२, आय३+, आय३+एक्सएल, आय५, आय५एक्सएल, आय५+ आणि आय६ असे सात व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत. यात ८० एचपी क्षमतेचे बीएस६ इंजिन देण्यात आले आहे, जे श्रेणीत सर्वोत्तम पॉवर, मायलेज, पेलोड, लोड बॉडी लांबी आणि लोडिंग स्पेस प्रदान करते. यामुळे ग्राहकांना प्रत्येक ट्रिपमध्ये अधिक नफा मिळवण्यास मदत होते. कमी टर्निंग रेडियस आणि श्रेणीतील सर्वोत्तम ग्राउंड क्लीअरन्समुळे बडा दोस्त हे शहरांतर्गत आणि दोन शहरांमधील वाहतुकीसाठी उपयुक्त वेईकल आहे, जे सर्व प्रकारच्या रस्त्यांवरून सहज प्रवास करू शकते.
दोस्त रेंज बाजारपेठेतील विविध गरजा आणि उपयोगांनुसार दोस्त एक्सएल आणि दोस्त+ एक्सएल या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
पार्टनर आधुनिक आणि अत्यंत इंधन-कार्यक्षम मालवाहू वेईकल आहे, जे ४-टन पेलोड श्रेणीतील गरजा पूर्ण करते. ही वेईकल ४ टायर आणि ६ टायर अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असून यात १० फूट, ११ फूट, १४ फूट आणि १७ फूट लोड बॉडीचे पर्याय मिळतात. पार्टनर आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या वेईकल प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या वेईकलमध्ये सुप्रसिद्ध झेडडी३० सीआरडीआय इंजिन देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर