फिफा विश्वचषक २०२६: रोमांचक मुकाबल्यात बेल्जियमचा सेनेगलवर ३-२ ने सनसनाटी विजय
सिएटल (अमेरिका), 02 जुलै (हिं.स.) : फिफा विश्वचषक २०२६ मधील सर्वात नाट्यमय पुनरागमनांपैकी एक कामगिरी बेल्जियमने करून दाखवली. ''राउंड ऑफ ३२'' च्या या रोमांचक सामन्यात दोन गोलची पिछाडी भरून काढत, बेल्जियमने अतिरिक्त वेळेत सेनेगलचा ३-२ असा पराभव केल
बेल्जियमचा फुटबॉल संघ


सिएटल (अमेरिका), 02 जुलै (हिं.स.) : फिफा विश्वचषक २०२६ मधील सर्वात नाट्यमय पुनरागमनांपैकी एक कामगिरी बेल्जियमने करून दाखवली. 'राउंड ऑफ ३२' च्या या रोमांचक सामन्यात दोन गोलची पिछाडी भरून काढत, बेल्जियमने अतिरिक्त वेळेत सेनेगलचा ३-२ असा पराभव केला. सामन्याच्या १२५ व्या मिनिटाला युरी टिलेमन्सच्या पेनल्टी किकमुळे बेल्जियमच विजय निश्चित झाला आणि या असाधारण लढतीनंतर त्यांनी 'अंतिम १६' (राउंड ऑफ १६) मध्ये प्रवेश केला.

या दोन देशांमधील हा पहिलाच सामना होता आणि सुरुवातीच्या काळात सेनेगलचे वर्चस्व दिसून आले. बेल्जियमच्या लिअँड्रो ट्रॉसार्डने सुरुवातीला आव्हान निर्माण केल्यानंतर सेनेगलने सामन्यावर नियंत्रण मिळवले. इस्माइला सारचा फटका गोलपोस्टला लागला आणि त्यानंतर सादियो मानेने एक उत्कृष्ट 'क्रॉस' दिला. त्यानंतर सारचा 'हेडर' पुन्हा एकदा गोलपोस्टच्या खांबालाआदळला, पण हबीब दियारा याने तत्परता दाखवत 'रिबाउंड' झालेल्या चेंडूवर गोल केला.

दरम्यान, सारने एक लांबचा पास पकडला, बेल्जियमच्या बचावपटूंना मागे टाकले आणि थिबाउट कोर्टुआला चकवून शांतपणे गोल करत संघाची आघाडी २-० अशी केली. सारचा या स्पर्धेतील हा चौथा गोल होता. ज्यामुळे एकाच विश्वचषकात आफ्रिकन फुटबॉलपटूने सर्वाधिक गोल करण्याच्या रॉजर मिला (१९९०) यांच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या संकटाचा सामना करत असताना, बेल्जियमने आपल्या अनुभवी बदली फुटबॉलपटूंच्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले.

रोमेलू लुकाकूने थॉमस म्युनियरच्या क्रॉसवर 'निअर-पोस्ट' जवळून अचूक फटका मारत पहिला गोल केला आणि त्यानंतर टिलेमन्सने ट्रॉसार्डच्या पासवर जोरदार गोल करत सेनेगलची आघाडी पुसून टाकली व सामना अतिरिक्त वेळेत नेला. अतिरिक्त वेळेत दोन्ही संघांनी संधी निर्माण केल्या; सेनेगलचा इब्राहिम एमबाये गोलच्या जवळ पोहोचला होता, तर बेल्जियमच्या डोडी लुकेबाकिओचा फटका क्रॉसबारला लागला. जेव्हा पेनल्टी अटळ वाटत होती, तेव्हा लॅमिन कॅमाराने पेनल्टी एरियामध्ये टिलेमन्सवर फाऊल केल्यामुळे व्हीएआरने हस्तक्षेप केला. बेल्जियन मिडफिल्डरने १२५ व्या मिनिटाला पेनल्टी स्पॉटवर शांतपणे गोल करून एक आश्चर्यकारक पुनरागमन घडवले आणि बेल्जियमची अपराजित मालिका १७ सामन्यांपर्यंत वाढवली.

या नाट्यमय विजयामुळे बेल्जियमची अपराजित मालिका १७ सामन्यांपर्यंत कायम आहे. आणि त्यांनी अधिकृतपणे राऊंड ऑफ १६ मध्ये प्रवेश केला आहे. आता त्यांचा सामना अमेरिका विरुद्ध बोस्निया आणि हर्झेगोविना यांच्यातील सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande