गोदरेज प्रॉपर्टीजकडून सुमारे ४७ एकर जमिनीची खरेदी
मुंबई, 02 जुलै (हिं.स.)। गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (BSE: GODREJPROP) ही देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक महत्त्वाची कंपनी म्हणून ओळखली जाते. आज कंपनीने एका मोठ्या कराराची घोषणा केली आहे. जीपीएलने चेन्नई शहरातील दक्षिण भागातील व
गोदरेज


मुंबई, 02 जुलै (हिं.स.)। गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (जीपीएल) (BSE: GODREJPROP) ही देशातील अग्रगण्य रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक महत्त्वाची कंपनी म्हणून ओळखली जाते. आज कंपनीने एका मोठ्या कराराची घोषणा केली आहे. जीपीएलने चेन्नई शहरातील दक्षिण भागातील वेगाने विकसित होणा-या भूभागातील सुमारे ४७ एकर जमीन थेट खरेदी केली आहे. हा परिसर चेन्नईतील ओल्ड महाबलीपुरम रोडजवळ स्थित आहे. हा भाग रिअल इस्टेटसाठी वेगानि विकसित होणारी बाजारपेठ मानला जात आहे.

या जमिनीवर प्रामुख्याने निवासी भूखंडाचा विकास केला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे १२ लाख चौरस फूट क्षेत्राचा विकास होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण निवासी प्रकल्पातून तब्बल २०० कोटींचा महसूल मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकल्प दक्षिण चेन्नईमधील वाढत्या निवासी संकुलाच्या मागणीची पूर्तता करण्यास मदत करेल.

हा प्रकल्प ओल्ड महाबलीपुरम रोडमधून शहराशी जोडला जाईल. ओल्ड महाबलीपुरम रोडजवळील या परिसरातून विविध महत्त्वाच्या रोजगार केंद्रांपर्यंत सहज पोहोचता येते. यामध्ये नामांकित सिपकॉट आयटी पार्कचाही समावेश आहे. वंडलूर, गुडुवांचेरी आणि महाबलीपुरम यांसारख्या वेगाने विकसित होणा-या नव्या औद्योगिक आणि व्यावसायिक भागांशीही हा प्रकल्प जोडलेला आहे. त्यामुळे येथे राहणा-या लोकांना नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी ये-जा करणे सुलभ होईल.

या परिसरात आरोग्य केंद्रे, शिक्षण संस्था, किरकोळ खरेदीची केंद्रे तसेच विविध मनोरंजन सुविधा उपलब्ध आहेत. विविध सोयीसुविधांच्या उपलब्धतेमुळे हा परिसरात निवासी क्षेत्राची मागणी वाढू लागली आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव पांडे म्हणाले, “दक्षिण चेन्नईमध्ये निवासी घरांची मागणी सातत्याने वाढत आहे. घर खरेदी करण्यासाठी इच्छुक ग्राहक भविष्याचा विचार करत नियोजित तसेच सोयीसुविधांनी परिपूर्ण गृहनिवास प्रकल्पांकडे आकर्षित होतात. उत्तम जीवनशैली आणि गुंतवणूकीचे दीर्घकालीन मूल्य मिळावे, यांकडे त्यांचा कल असतो. पायाभूत सुविधांचा वेगवान विकास आणि ग्राहकांच्या वाढत्या आवडीमुळे हा भाग सर्वात आश्वासक बाजारपेठ म्हणून समोर आला आहे. ग्राहकांच्या या बदलत्या गरजा पूर्ण करणारे आणि त्यांना दीर्घकाळ उत्तम परतावा देणारे प्रकल्प उभारण्यावर आमचा भर आहे. या नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही चेन्नईतील उपस्थिती मजबूत करत आहोत. यातून आमची दर्जेदार आणि विश्वासार्ह प्रकल्प उभारण्याची बांधिलकीही कायम राहील.”

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande