इंदापूर हादरले! नगरपरिषद बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला
पुणे, 02 जुलै (हिं.स.)। इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर गुरुवारी नगरपरिषद कार्यालयाबाहेर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला करण्यात आला. नगरपरिषदेची बैठक संपवून ते बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक धाव घेत च
fgdf


पुणे, 02 जुलै (हिं.स.)।

इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर गुरुवारी नगरपरिषद कार्यालयाबाहेर दिवसाढवळ्या जीवघेणा हल्ला करण्यात आला. नगरपरिषदेची बैठक संपवून ते बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक धाव घेत चॉपर आणि चाकूने हल्ला चढविला.

या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हातावर गंभीर वार झाला. मात्र, त्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, पवार यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले वसीम शेख यांनाही हल्ल्यात दुखापत झाली.

जखमी अनिल पवार आणि वसीम शेख या दोघांवर इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. तसेच, हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

हल्लेखोरांची ओळख अद्याप पटलेली नसून, हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. दिवसाढवळ्या नगरपरिषद कार्यालयाबाहेर झालेल्या या हल्ल्यामुळे इंदापूर शहरात खळबळ उडाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande