
नंदुरबार, 02 जुलै, (हिं.स.) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील पोलीस मुख्यालय, विविध पोलीस स्टेशन तसेच इतर उपकार्यालयांमध्ये जमा झालेले जुने आणि जीर्ण झालेले साहित्य व साधनसामग्रीचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे. ही लिलाव प्रक्रिया सोमवार, दिनांक 6 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता पोलीस मुख्यालय, टोकर तलाव रोड, राजीव गांधी मार्ग, नंदुरबार येथे पार पडणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अश्विनी सानप यांनी कळविले आहे.
या लिलावामध्ये संगणक, प्रिंटर, झेरॉक्स मशिन, लोखंडी कपाटे, पत्रे, खुर्च्या, टेबल आणि इतर विविध जुन्या साहित्याचा समावेश आहे. या जाहीर लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या स्थानिक दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी समक्ष हजर राहावे, असेही आवाहन पोलीस अधीक्षक श्रीमती सानप यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर