रत्नागिरीत मान्सूनच्या पुनरागमनाने भात लावणीला वेग
रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने पुन्हा जोरदार हजेरी लावल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतांमध्ये भातलावणीची लगबग सुरू झाली आहे
भातलावणीला वेग


रत्नागिरी, 2 जुलै (हिं.स.) । गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने पुन्हा जोरदार हजेरी लावल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, शेतांमध्ये भातलावणीची लगबग सुरू झाली आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत असताना अनेक शेतकऱ्यांनी कृत्रिम पाण्याच्या साहाय्याने भात रोपवाटिका जिवापाड जपल्या होत्या. आता समाधानकारक पाऊस झाल्याने या रोपवाटिका लावणीसाठी सज्ज झाल्या आहेत. शेतकरी आणि महिला पारंपरिक पद्धतीने भातलावणी करत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

हिरवीगार भातरोपे, पावसाच्या सरी आणि शेतकऱ्यांची सुरू असलेली लगबग यामुळे कोकणातील शेती पुन्हा बहरल्याचे चित्र आहे. काही भागांमध्ये लावणीसाठी अद्याप १५ ते २० दिवस प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी मान्सूनच्या पुनरागमनामुळे यंदाच्या खरीप हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande