बीड - अवैध दारूच्या 243 गुन्ह्यांतील जप्त 7.83 लाखांचा मुद्देमाल नष्ट
बीड, 21 जुलै, (हिं.स.)। आष्टी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध दारू प्रकरणांतील जप्त मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करण्यात आला. एकूण 243 गुन्ह्यांमधील 7,83,978 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्
पोलीस कारवाई


बीड, 21 जुलै, (हिं.स.)। आष्टी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध दारू प्रकरणांतील जप्त मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करण्यात आला. एकूण 243 गुन्ह्यांमधील 7,83,978 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांची पडताळणी केली. यामध्ये 1,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 235 गुन्हे न्यायालयाच्या आदेशानुसार, तर 1,000 रुपयांखालील 8 गुन्हे एसडीपीओ यांच्या परवानगीनंतर निकाली काढण्यात आले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या उपस्थितीत आणि आवश्यक परवानग्या घेऊन जप्त दारूचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.

या कारवाईत पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी सहभागी होते. अवैध दारूविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी भविष्यातही अशा मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande