
नाशिक, 27 जुलै (हिं.स.)।
- सोशल मीडियावरून महिलेला शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याचे धमकी देणारे मेसेज पाठविणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी दुर्गेशसिंग, शुभम सिंग, उधमसिंग, निगमसिंग व सरनामसिंग (सर्वांची पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) यांनी रुद्रप्रतापसिंग फेसबुक आयडी सरनाम १२३४, सरनामसिंग, दुर्गेश टिकरा या नावाचे सोशल मीडियावर अकाऊंट उघडले व त्यावरून तक्रारदार महिलेला आक्षेपार्ह व चिथावणीखोर मेसेज पाठविले, तसेच अन्य सोशल माध्यमांवरून इतनी लाथ मारूँगा, तू नाशिक छोड देगी, अशा प्रकारे वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाऊंटवरून फिर्यादीला जिवे ठार मारण्याची धमकी देणारे मेसेज पाठवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV