यमनच्या किनारपट्टीजवळ लाल समुद्रात मालवाहू जहाजावर हल्ला; ब्रिटिश लष्कराकडून इशारा
सना, 05 जुलै (हिं.स.)। यमनच्या किनारपट्टीलगत लाल समुद्रात रविवारी एका मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याची माहिती ब्रिटिश लष्कराने दिली आहे. संघर्षग्रस्त यमनजवळ घडलेल्या सागरी हल्ल्यांमधील ही ताजी घटना आहे. युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (युकेएम
यमनच्या किनारपट्टीजवळ लाल समुद्रात मालवाहू जहाजावर हल्ला; ब्रिटिश लष्कराकडून इशारा


सना, 05 जुलै (हिं.स.)। यमनच्या किनारपट्टीलगत लाल समुद्रात रविवारी एका मालवाहू जहाजावर हल्ला झाल्याची माहिती ब्रिटिश लष्कराने दिली आहे. संघर्षग्रस्त यमनजवळ घडलेल्या सागरी हल्ल्यांमधील ही ताजी घटना आहे. युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स (युकेएमटीओ) ने इराण समर्थित हूती बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या होदेदा या किनारी शहराजवळ हा हल्ला झाल्याचे सांगितले आहे.

युकेएमटीओच्या माहितीनुसार, होदेदा शहरापासून सुमारे ३० सागरी मैल (५५ किलोमीटर) नैऋत्य दिशेला असताना मालवाहू जहाजाने अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केल्याची माहिती दिली.एजन्सीच्या म्हणण्यानुसार, एका लहान बोटीने (स्किफ) बल्क कॅरिअरजवळ येत गोळीबार सुरू केला. त्यानंतर जहाजावरील सुरक्षा रक्षकांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.यानंतर हल्लेखोरांची बोट आपली ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम बंद करून सुमारे २ सागरी मैल (३.७ किलोमीटर) अंतरावर असलेल्या एका मोठ्या जहाजाकडे परत गेली.

ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, मालवाहू जहाज आणि त्यावरील सर्व कर्मचारी सुरक्षित असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. युकेएमटीओ ने सर्व जहाजांना सतर्क राहण्याचे आणि कोणताही धोका जाणवल्यास तात्काळ संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, हूती बंडखोरांनी लाल समुद्रातील जहाजांवर पुन्हा हल्ले करण्याची धमकी दिली असली, तरी अलीकडे त्यांनी कोणताही हल्ला केला नव्हता. या घटनेवरही हूती प्रवक्त्यांनी तत्काळ कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.यापूर्वी हूती बंडखोरांनी गाझा युद्धादरम्यान लाल समुद्राच्या दक्षिण टोकावरील बाब-अल-मंदेब सामुद्रधुनी परिसरातून जाणाऱ्या जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले केले होते. या हल्ल्यांमुळे अनेक जहाजवाहतूक कंपन्यांनी लाल समुद्र आणि सुएझ कालवा मार्ग टाळून आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील अधिक लांब सागरी मार्गाचा अवलंब केला.

अलीकडे अदनच्या आखातात सोमाली समुद्री चाच्यांची सक्रियता वाढली आहे. १ जुलै रोजी दक्षिण-पूर्व येमेनमधील बलहाफ बंदरापासून सुमारे ७६ सागरी मैल (१४० किलोमीटर) दक्षिणेला संशयित समुद्री चाच्यांनी एका जहाजावर हल्ला केला होता. युकेएमटीओच्या माहितीनुसार, त्या वेळी एका छोट्या बोटीवरून आलेल्या चार सशस्त्र व्यक्तींनी जहाजाच्या ब्रिजचे किरकोळ नुकसान केले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande