
नांदेड, 05 जुलै (हिं.स.)।
हिमायतनगर तालुक्यातील ८७ भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक शाखेत जमा करण्यात आल्याचा दावा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप खात्यात जमा न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पंचायत समितीकडून वेतनाचा धनादेश वेळेत कर्मचाऱ्यांनी केला असून, अनेक दिवस उलटल्यानंतरही वेतन जमा झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पंचायत समितीने दि. २४ जून रोजी सुमारे ७ लाख ६९ हजार रुपयांचा धनादेश बँकेत जमा केला होता. मात्र, अद्याप वेतन खात्यात जमा न झाल्याने घरखर्च, कर्जाचे हप्ते आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविताना आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांनी बँकेकडे वारंवार चौकशी केली असता समाधानकारक माहिती मिळत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच, काही कर्मचाऱ्यांनी बँकेत चौकशीदरम्यान अरेरावीची वागणूक दरम्यान, शाखा व्यवस्थापकांनी तांत्रिक अडचणीमुळे धनादेशाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याचे सांगितले आहे. मात्र, संबंधित तांत्रिक अडचणीचे स्वरूप आणि मिळाल्याची तक्रारही केली आहे. ती दूर करण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
रखडलेले वेतन तातडीने खात्यात जमा करावे आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच, लवकर प्रश्न निकाली न निघाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis