इराणचे नेतृत्व एका हल्ल्यात संपवू शकतो, खामेनेईंच्या अंत्यसंस्कारादरम्यान ट्रम्प यांचा इशारा
तेहरान , 05 जुलै (हिं.स.)।इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. अमेरिकेला हवे असल्यास इराणच्या उर्वरित सर्वोच्च नेतृत्वाचा एका हल्ल्यात खात्
भारत-पाक युद्ध टॅरिफच्या धमकीने थांबवल्याचा ट्रम्प यांचा पुन्हा दावा


तेहरान , 05 जुलै (हिं.स.)।इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. अमेरिकेला हवे असल्यास इराणच्या उर्वरित सर्वोच्च नेतृत्वाचा एका हल्ल्यात खात्मा करता येऊ शकतो, असा दावा ट्रम्प यांनी केला. मात्र, तसे केल्यास चर्चेसाठी कोणीच उरणार नाही, त्यामुळे अमेरिका असा निर्णय घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प म्हणाले की, इराणचे सर्व प्रमुख नेते सध्या एका ठिकाणी उपस्थित आहेत आणि अमेरिका इच्छित असेल तर एका हल्ल्यात त्यांना लक्ष्य करू शकते. मात्र, असे करणे योग्य ठरणार नाही, कारण त्यानंतर कोणत्याही प्रकारच्या चर्चा किंवा कराराचा मार्ग कायमचा बंद होईल. ट्रम्प यांनी पुढे दावा केला की, इराणला करार करायचा आहे आणि दोन्ही देशांनी खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत एक आठवडा लष्करी कारवाई आणि चर्चा स्थगित ठेवण्यावर सहमती दर्शवली आहे. त्यांच्या मते, या काळात दोन्ही देश एकमेकांवर कोणताही हल्ला करणार नाहीत.

अली खामेनेई यांच्या अंतिम दर्शनासाठी लाखो नागरिक रस्त्यावर उतरले असून, हा सोहळा जगभरात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या घटनांपैकी एक ठरत आहे. अंत्यसंस्कारादरम्यान इराणचे संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाकेर गालिबाफ आणि परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची भावूक झाल्याचे दिसून आले. त्यांच्या डोळ्यांत अश्रूही दिसले. यावर प्रतिक्रिया देताना ट्रम्प म्हणाले की, इराणची जनता खामेनेई यांचा तिरस्कार करते, असे त्यांना वाटत होते. तसेच हे अश्रू खरे नसून केवळ दिखावा असू शकतात, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. यापूर्वीही ट्रम्प यांनी अमेरिका इराणला अंत्यसंस्कारासाठी एक आठवड्याची मुदत देत असून, त्यानंतर पुन्हा कराराच्या दिशेने वाटचाल करू इच्छित असल्याचे म्हटले होते.

दरम्यान, खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार की नाही, याबाबतही मोठी चर्चा सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ते सार्वजनिकरीत्या कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इस्रायलकडून संभाव्य हल्ला किंवा पाळत ठेवली जाण्याच्या धोक्यामुळे त्यांची उपस्थिती धोकादायक ठरू शकते, असे मानले जात आहे.

अली खामेनेई यांनी तब्बल ३६ वर्षे इराणचे सर्वोच्च नेते म्हणून काम पाहिले. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर मध्य पूर्वेत युद्ध भडकले आणि त्याच काळात त्यांचे निधन झाले. युद्धजन्य परिस्थितीमुळे इस्लामी परंपरेनुसार अंत्यसंस्कार तातडीने करता आले नाहीत.इराणने ४ जुलैपासून अंत्यसंस्काराच्या विधींना सुरुवात केली आहे. ७ जुलै रोजी कुम येथे धार्मिक कार्यक्रम होणार असून ९ जुलै रोजी त्यांच्या जन्मगावी मशहद येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande