इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांचा अमेरिकेवर फिफा विश्वचषकात फसवणुकीचा आरोप
तेहरान , 08 जुलै (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये केवळ लष्करी संघर्षच नव्हे, तर फुटबॉलच्या मैदानावर (फिफा विश्वचषक) देखील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. इराणने अमेरिकेवर मनमानी केल
इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांचा अमेरिकेवर फिफा विश्वचषकात फसवणुकीचा आरोप


तेहरान , 08 जुलै (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा एकदा धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. दोन्ही देशांमध्ये केवळ लष्करी संघर्षच नव्हे, तर फुटबॉलच्या मैदानावर (फिफा विश्वचषक) देखील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. इराणने अमेरिकेवर मनमानी केल्याचा आरोप केला असून, आपल्या सीमेजवळ तैनात असलेल्या अमेरिकन शक्तींना उघड इशाराही दिला आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर अमेरिकेवर जोरदार टीका केली आहे. सध्या अमेरिका विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियन यांनी आरोप केला की, यजमान देश म्हणून अमेरिका नियमांना आपल्या सोयीप्रमाणे वाकवत आहे, प्रतिस्पर्ध्यांना धमकावत आहे, इतरांसाठी अडचणी निर्माण करत आहे आणि फसवणुकीचा मार्ग अवलंबत आहे.

त्यांनी म्हटले की, अमेरिकेचे हे वर्तन तिच्या ‘मागा’ (मेक अमेरिका ग्रेट अगेन) धोरणाचे प्रतिबिंब आहे, जे तिच्या दादागिरीच्या परराष्ट्र धोरणाचे दर्शन घडवते. त्यांनी स्पष्ट केले की, इराण अशा घाणेरड्या डावपेचांना सहन करणार नाही आणि आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभा राहील.

या सर्व विधानांवरून असे दिसून येते की, अमेरिकेकडून इराणच्या हद्दीत करण्यात आलेल्या कथित हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील तणाव युद्धजन्य परिस्थितीकडे झुकत आहे. इराण आता केवळ लष्करी पातळीवरच नव्हे, तर क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय मंचांवरही अमेरिकेला घेरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande