अमेरिकन लष्करी तळांवर इराणचे क्षेपणास्त्र हल्ल्यांचे दावे
तेहरान, 09 जुलै (हिं.स.)।इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकन लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्याचा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) च्या एरोस्पेस फोर्सने म्हटले
अमेरिकन लष्करी तळांवर इराणचे क्षेपणास्त्र हल्ल्यांचे दावे


तेहरान, 09 जुलै (हिं.स.)।इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकन लष्करी तळांवर प्रत्युत्तरात्मक कारवाई केल्याचा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (आयआरजीसी) च्या एरोस्पेस फोर्सने म्हटले आहे की, तेहरान आणि इतर भागांवरील अमेरिकन हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले.

आयआरजीसीने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या कारवाईत कुवेतमधील अरिफजान आणि अली अल सलेम हवाई तळ, तसेच बहरीनमधील जुफैर आणि शेख ईसा हवाई तळांना लक्ष्य करण्यात आले. इराणचा दावा आहे की, कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. आयआरजीसीने आपल्या निवेदनात म्हटले की, नौदल आणि एरोस्पेस दलाने संयुक्तपणे अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले.निवेदनानुसार, ही कारवाई अमेरिकेच्या त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली आहे, ज्यांना इराणने आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले आहे.

अमेरिकेच्या कारवाईवर टीका करताना आयआरजीसीने आरोप केला की, अमेरिकेने आपल्या आश्वासनांचे आणि बांधिलकीचे उल्लंघन केले आहे. तसेच, अमेरिकेने इराणच्या दक्षिणेकडील किनारी प्रांतांतील अनेक ठिकाणांना लक्ष्य केल्याचा आरोपही करण्यात आला. याशिवाय, पूर्वेकडील भागातील मशहद शहराकडे जाणाऱ्या दोन पुलांवरही हल्ला करण्यात आल्याचा दावा इराणने केला आहे. इराणच्या मते, हे हल्ले अशा वेळी करण्यात आले जेव्हा देशात दिवंगत सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित कार्यक्रम सुरू होते. आयआरजीसीने अमेरिकेच्या कारवाईला “गुन्हेगारी कृत्य” संबोधत म्हटले की, यामुळे जगभरातील लोकांमध्ये संताप आणखी वाढेल.

आयआरजीसीने इशारा दिला आहे की, जर अमेरिकेने पुन्हा हल्ले केले तर इराणची प्रत्युत्तरात्मक कारवाई अधिक व्यापक असेल. पुढील काळात अमेरिकेच्या इतर लष्करी तळांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, असेही निवेदनात म्हटले आहे.निवेदनात पुढे म्हटले आहे, “इस्लामी योद्धे अमेरिकन सैन्याच्या आक्रमकतेला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत. जर अमेरिकेने आपली कारवाई पुन्हा केली, तर त्याला आणखी मोठ्या प्रमाणावर प्रत्युत्तर दिले जाईल आणि या प्रदेशातील इतर अमेरिकन तळांनाही लक्ष्य केले जाऊ शकते.”

दरम्यान, इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की, या हल्ल्यांचा परिणाम बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या पाचव्या ताफ्याच्या (यूएस फिफ्थ फ्लीट) मुख्यालयावरही झाला आहे.

आयआरआयबीच्या वृत्तानुसार, इराणमधील बुशेहर शहरातून अमेरिकन तळांच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. विशेष म्हणजे, याच्या काही तासांपूर्वी अमेरिकेने बुशेहर परिसराला लक्ष्य केले होते.दुसरीकडे, कुवेतच्या सैन्याने सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा येणारी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन रोखण्याचा प्रयत्न करत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande