भारत-पाक संघर्ष रोखल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार
वॉशिंग्टन , 09 जुलै (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी म्हटले की दोन्ही देशांमधील तणाव अणुयुद्धापर्यंत पोहोचू शकला
आम्ही आज रात्री इराणवर जोरदार हल्ला करू- ट्रम्प


वॉशिंग्टन , 09 जुलै (हिं.स.)। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांनी म्हटले की दोन्ही देशांमधील तणाव अणुयुद्धापर्यंत पोहोचू शकला असता, ज्यामुळे लाखो लोकांचे प्राण जाऊ शकले असते.

ब्रिटनमधील रॉयल एअर फोर्स मिल्डेनहॉल एअरबेस येथे एअर फोर्स वन विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, “विचार करा, भारत आणि पाकिस्तान. ते युद्ध सुरू होते. त्याला एक आठवडा झाला होता. ११ विमाने पाडली गेली होती आणि ते युद्ध अणुसंघर्षात परिवर्तित होण्याच्या मार्गावर होते.” ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी युद्ध थांबवण्यात त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले होते. ते म्हणाले, “पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगितले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी तीन ते पाच कोटी लोकांचे प्राण वाचवले. पण प्रत्यक्षात ही संख्या याहूनही खूप मोठी असू शकली असती.”

यावेळी ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय वाद मिटवण्याच्या आपल्या कामगिरीचाही उल्लेख केला आणि अनेक युद्धे थांबवण्यात आपण भूमिका बजावल्याचा दावा केला. ते म्हणाले, “मी आठ युद्धे संपवली आहेत.” ट्रम्प यांनी अझरबैजान आणि आर्मेनिया यांच्यातील संघर्ष तसेच काँगो लोकशाही प्रजासत्ताक आणि रवांडा यांच्यातील वादाचाही उल्लेख केला.

नोबेल शांतता पुरस्काराचा संदर्भ देताना ट्रम्प म्हणाले की व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी सार्वजनिकरीत्या असे म्हटले होते की विविध संघर्ष सोडवण्यात भूमिका बजावल्यामुळे ते इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा या पुरस्कारासाठी अधिक पात्र आहेत.ट्रम्प म्हणाले, “आतापर्यंत ज्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळाला आहे, त्या सर्वांपूर्वी मला हा पुरस्कार मिळायला हवा होता, कारण इतकी युद्धे कुणीही थांबवलेली नाहीत. मी माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या बळावर आठ युद्धे संपवली आहेत.”

यापूर्वी, गेल्या आठवड्यात माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी दावा केला होता की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य सर्वांगीण युद्ध त्यांनी दोन्ही देशांवर शुल्क (टॅरिफ) लावण्याची धमकी देऊन रोखले होते. ते म्हणाले, “मी टॅरिफच्या माध्यमातून आठ युद्धे थांबवली. भारत-पाकिस्तान त्यापैकी एक आहे. आठपैकी पाच युद्धे टॅरिफमुळे थांबली.” ते पुढे म्हणाले, “मी त्यांना सांगितले की जर तुम्ही लढाई सुरूच ठेवली, तर मी तुमच्या देशावर २०० टक्के टॅरिफ लावीन. मी दुसऱ्या देशालाही हेच सांगितले. भारत आणि पाकिस्तान या दोघांनाही मी हेच सांगितले होते.”

मात्र, भारत-पाकिस्तानमधील तणाव कमी होण्याचे श्रेय स्वतःकडे घेणाऱ्या ट्रम्प यांच्या दाव्यांना नवी दिल्लीने सातत्याने फेटाळून लावले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की शस्त्रसंधी दोन्ही देशांच्या लष्करी अभियान महासंचालकांमधील द्विपक्षीय चर्चेद्वारे झाली होती.पाकिस्तानशी संबंधित सर्व प्रश्न पूर्णपणे द्विपक्षीय स्वरूपाचे आहेत आणि त्यामध्ये कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीसाठी जागा नाही, हा आपला दीर्घकालीन दृष्टिकोन भारताने पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande