राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : प्रीती आणि जस्मिनला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक
ग्लासगो, १ ऑगस्ट (हिं.स.) २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची प्रभावी कामगिरी सुरूच आहे. प्रीती पवार आणि जस्मिन लंबोरिया यांनी आपापल्या गटात सुवर्णपदके जिंकून भारताच्या पदकतालिकेत आणखी दोन पदकांची भर घातली. दोन्ही भारतीय बॉक्सर्स
प्रीती पवार


ग्लासगो, १ ऑगस्ट (हिं.स.) २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सची प्रभावी कामगिरी सुरूच आहे. प्रीती पवार आणि जस्मिन लंबोरिया यांनी आपापल्या गटात सुवर्णपदके जिंकून भारताच्या पदकतालिकेत आणखी दोन पदकांची भर घातली. दोन्ही भारतीय बॉक्सर्सनी अंतिम सामना एकतर्फी जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रीतीने महिलांच्या ५४ किलो गटात कॅनडाच्या स्कारलेट सवाना डेलगाडोचा ५-० अशा एकमताने पराभव करून सुवर्णपदक जिंकले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच प्रीतीने आपल्या वेगवान लय, अचूक ठोसे आणि उत्कृष्ट टायमिंगने कॅनेडियन बॉक्सरवर दबाव कायम ठेवला. पाचही पंचांनी तिन्ही फेऱ्यांमध्ये ३०-२७ अशा समान गुणांसह प्रीतीला विजेती घोषित केले.

दुसऱ्या फेरीत प्रीतीच्या सातत्यपूर्ण आणि अचूक ठोशांमुळे डेलगाडो खाली पडली. कॅनेडियन बॉक्सरने अंतिम फेरीत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण प्रीतीने आपला संयम राखत, अंतराचा प्रभावीपणे वापर करून आणि अचूक ठोसे मारून लढत नियंत्रणात ठेवली. संपूर्ण स्पर्धेत प्रीतीची कामगिरी प्रभावी होती. तिने झांबियाच्या कॅथरीन म्वापेला ५-० ने पराभूत करून थेट उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्या लढतीत, तिने आपल्या प्रतिस्पर्ध्याला तीन वेळा स्टँडिंग काउंटवर आणून अंतिम फेरीत प्रवेश केला.

जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जस्मिन लँबोरियानेही महिलांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले. तिने गतविजेती मिशेला वॉल्श (उत्तर आयर्लंड) हिला ५-० अशा एकमताने पराभूत केले.पहिली फेरी अटीतटीची झाली, ज्यात दोन पंचांनी वॉल्शला आघाडी दिली, तर इतर तिघांनी जस्मिनच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर भारतीय बॉक्सरने उल्लेखनीय पुनरागमन केले आणि दुसऱ्या फेरीपासून लढतीवर पूर्ण नियंत्रण मिळवले. तिने आपल्या अचूक कॉम्बिनेशन पंचांनी पाचही पंचांची पसंती मिळवली आणि तिसऱ्या फेरीतही आपले वर्चस्व कायम ठेवत सुवर्णपदक जिंकले.

उपांत्य फेरीच्या एकतर्फी लढतीत जास्मिनने लेसोथोच्या रापेलांग मासेलेलाचा पराभव केला. दुसऱ्या फेरीत तीन स्टँडिंग काउंट मिळाल्यानंतर पंचांनी सामना थांबवला. बर्मिंगहॅम २०२२ मध्ये ६० किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकणाऱ्या जास्मिनने यावेळी सुवर्णपदक जिंकून आपली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अविस्मरणीय केली. २०२५ मध्ये विश्वविजेती बनल्यानंतर, तिने आता राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ५७ किलो वजनी गटातील आपले वर्चस्व आणखी मजबूत केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande