जेट इंधनाच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची वाढ
विमान प्रवास महागण्याची शक्यता नवी दिल्ली, १ ऑगस्ट (हिं.स.) : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) अर्थात जेट इंधनाच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चात वाढ होण्य
Hike Jet Fuel Prices


विमान प्रवास महागण्याची शक्यता

नवी दिल्ली, १ ऑगस्ट (हिं.स.) : सरकारी तेल विपणन कंपन्यांनी शनिवारी एव्हिएशन टर्बाइन इंधन (एटीएफ) अर्थात जेट इंधनाच्या दरात प्रति लिटर ५ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीमुळे विमान कंपन्यांच्या परिचालन खर्चात वाढ होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम विमान भाड्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नव्या दरानुसार, राजधानी नवी दिल्लीत जेट इंधनाचा दर प्रति लिटर ११० रुपयांवरून ११५ रुपयांपर्यंत वाढला आहे. तसेच, घाऊक दरानुसार जेट इंधनाचा दर प्रति किलोलिटर १.१० लाख रुपयांवरून १.१५ लाख रुपयांवर पोहोचला आहे.

विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चापैकी सुमारे ४० टक्के खर्च जेट इंधनावर होतो. त्यामुळे इंधनाच्या दरात झालेली वाढ विमान कंपन्यांच्या आर्थिक भारात भर घालणार आहे. परिणामी, वाढीव खर्चाची भरपाई करण्यासाठी विमान कंपन्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या दरात कोणताही बदल केलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande