पंतप्रधान मोदींकडून आंध्र प्रदेशातील 17,900 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील भोगापूरम येथे 17,900 कोटी रुपयांहून अधिकच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. यापूर्वी पंतप्रधानांनी भोगापूरम येथील
PM Modi Inaugurates Foundation Stones Andhra Pradesh


PM Modi Inaugurates Foundation Stones Andhra Pradesh


PM Modi Inaugurates Foundation Stones Andhra Pradesh


अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यातील भोगापूरम येथे 17,900 कोटी रुपयांहून अधिकच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली.

यापूर्वी पंतप्रधानांनी भोगापूरम येथील अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवासी टर्मिनलची पाहणी केली. त्यानंतर सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलअंतर्गत 5,640 कोटी रुपयांहून अधिक खर्चातून विकसित करण्यात आलेल्या या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले आणि भोगापूरम येथील 17,900 कोटी रुपयांहून अधिकच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करून ते राष्ट्राला समर्पित केले.

वार्षिक 60 लाख प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानतळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), बायोमेट्रिक प्रवासी प्रक्रिया, स्वयंचलित बॅगेज प्रणाली आणि एअरपोर्ट प्रेडिक्टिव्ह ऑपरेशन्स सेंटर यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या विमानतळाची वास्तुरचना आंध्र प्रदेशातील पारंपरिक ‘चुट्टिलु’ झोपड्या, अराकू खोरे आणि उडणाऱ्या माशापासून प्रेरित आहे.

पंतप्रधानांनी विशाखापट्टणम येथे 460 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या आंध्र प्रदेशातील पहिल्या सेमीकंडक्टर उत्पादन युनिटचीही पायाभरणी केली. इंडिया सेमीकंडक्टर मिशनअंतर्गत मंजूर करण्यात आलेला हा प्रकल्प एएसआयपी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड आणि दक्षिण कोरियाच्या एपीएसीटी यांच्या सहकार्याने विकसित केला जात आहे. या प्रकल्पात दरवर्षी सुमारे 9.6 कोटी सेमीकंडक्टर चिप्सचे उत्पादन होणार असून उच्च कौशल्याधारित रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील.

याशिवाय पंतप्रधानांनी सुमारे 5,550 कोटी रुपयांच्या खर्चाच्या कुरनूल-4 अक्षय ऊर्जा क्षेत्र (आरईझेड) फेज-1 ट्रान्समिशन प्रणालीची पायाभरणी केली. त्यांनी सुमारे 3,550 कोटी रुपये आणि 820 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विविध वीज पारेषण प्रकल्पांचे उद्घाटनही केले. या प्रकल्पांमुळे कुरनूल आणि अनंतपूर येथील अक्षय ऊर्जा क्षेत्रांत निर्मित होणाऱ्या विजेचे राष्ट्रीय ग्रीडद्वारे देशभर अधिक प्रभावी वितरण शक्य होणार असून स्वच्छ ऊर्जेला चालना मिळेल.

पंतप्रधानांनी 1,880 कोटी रुपयांहून अधिकच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचेही लोकार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये एनएच-365बीजीवरील रेचेरला-गुरुवायगुडेम तसेच गुरुवायगुडेम-देवरापल्ले ग्रीनफिल्ड चारपदरी मार्ग, एनएच-67 वरील ताडीपत्री बायपास आणि एनएच-565 वरील लिंगसमुद्रम उच्चस्तरीय पूल यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे विजयवाड्यासह अनेक शहरांतील वाहतुकीचा ताण कमी होईल, रस्ते सुरक्षा वाढेल आणि विशाखापट्टणम-हैदराबाद दरम्यानच्या प्रवासाच्या वेळेत घट होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande