भारतीय बॅडमिंटनपटू तन्वी शर्माचा तैपेई ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश
तैपेई, १ ऑगस्ट (हिं.स.)भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू, तन्वी शर्माने, शानदार कामगिरीच्या जोरावर तैपेई ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, तिने यजमान चायनीज तैपेईच्या पाचव्या मानांकित
तन्वी शर्मा


तैपेई, १ ऑगस्ट (हिं.स.)भारताची उदयोन्मुख बॅडमिंटनपटू, तन्वी शर्माने, शानदार कामगिरीच्या जोरावर तैपेई ओपन २०२६ च्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात, तिने यजमान चायनीज तैपेईच्या पाचव्या मानांकित हुआंग यु-ह्सुनचा २१-१७, २१-११ अशा सरळ गेममध्ये पराभव करून विजेतेपदाच्या सामन्यात आपले स्थान निश्चित केले.

जागतिक क्रमवारीत ३४ व्या क्रमांकावर असलेल्या तन्वीने हा सामना अवघ्या ३३ मिनिटांत जिंकला. यावेळी, तिने उपांत्यपूर्व फेरीपेक्षाही अधिक प्रभावी खेळ करत यजमान संघाला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात तिचा सामना व्हिएतनामच्या गुयेन थुई लिन्हशी होईल.

गेल्या दोन वर्षांत, तन्वीने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये झपाट्याने ओळख मिळवली आहे. २०२४ बॅडमिंटन आशिया सांघिक चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा ती एक भाग होती. तिने २०२४ बॉन इंटरनॅशनल आणि २०२५ डेन्मार्क चॅलेंजचे विजेतेपदही पटकावले, तसेच २०२५ ओडिशा मास्टर्स सुपर १०० आणि गुवाहाटी मास्टर्स सुपर १०० मध्ये उपविजेतेपद मिळवले. तिच्या कारकिर्दीतील ही चौथी बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर अंतिम फेरी आणि दुसरी सुपर ३०० अंतिम फेरी असेल.

भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. भारताची शेवटची आशा असलेला किरण जॉर्ज उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या चौथ्या मानांकित युदाई ओकिमोतोकडून २१-१२, २१-१० ने पराभूत झाला. यापूर्वी, पुरुष दुहेरीमध्ये भार्गव राम अरिगेला आणि विश्व तेज गोब्बुरू यांची जोडी पहिल्याच फेरीत बाद झाली, तर एच.एस. प्रणॉय उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande