राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : तुमची कामगिरी तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल, पंतप्रधानांकडून पदक विजेत्यांचे अभिनंदन
नवी दिल्ली, 01 ऑगस्ट (हिं.स.)२०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरूच आहे. शुक्रवारी भारताने एकूण सहा पदके जिंकली. नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक, तर यशवीर सिंगने कांस्यपदक पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नी
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 01 ऑगस्ट (हिं.स.)२०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरूच आहे. शुक्रवारी भारताने एकूण सहा पदके जिंकली. नीरज चोप्राने भालाफेकीत रौप्यपदक, तर यशवीर सिंगने कांस्यपदक पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरजसह देशासाठी पदके जिंकणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

भालाफेक प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्राचे अभिनंदन केले.पंतप्रधानांनी म्हटले की, नीरज चोप्राने पुन्हा एकदा उल्लेखनीय सातत्य, संयम आणि जिद्द सिद्ध केली आहे.नीरज चोप्राच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे आणि नीरज चोप्राला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी 'एक्स'वर लिहिले आहे.“ग्लासगो येथील पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक जिंकले आहे. त्याने पुन्हा एकदा आपले उल्लेखनीय सातत्य, संयम आणि जिद्द सिद्ध केली आहे. त्याच्या यशाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..

“पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंहचे अभिनंदन! त्याने केलेली भालाफेक अत्यंत प्रभावी होती आणि त्यामधून त्याचा उत्साह आणि समर्पण दिसून आले. त्याच्या या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पुरुष गटातील भालाफेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल यश वीर सिंह याचे अभिनंदन! त्याने केलेली भालाफेक अत्यंत प्रभावी होती आणि त्यामधून त्याचा उत्साह आणि समर्पण दिसून आले. त्याच्या या कामगिरीमुळे अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळेल. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये ज्युडो या क्रीडा प्रकाराच्या 57 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी यामिनी मौर्यचे अभिनंदन केले आहे. यामिनी मौर्यने उत्कृष्ट कामगिरी केली आणि यामधून त्यांचा ज्युडो या खेळाबद्दलचा ध्यास स्पष्टपणे दिसून आला, असे त्यांनी म्हटले आहे.

तिची ही कामगिरी अनेक युवकांना ज्युडो या खेळाकडे वळण्याची प्रेरणा देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.पंतप्रधानांनी एक्सवरील पोस्ट मध्ये म्हटले की, “ज्युडो च्या 57 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकल्याबद्दल यामिनी मौर्य हिचे अभिनंदन! ती खूप छान खेळली आणि तिच्या कामगिरीतून ज्युडो या खेळाबद्दलचा तिचा ध्यास स्पष्टपणे दिसून आला. तिच्या या कामगिरीमुळे भविष्यात अनेक युवक ज्युडो या खेळाकडे आकर्षित होतील. तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

पुरुषांच्या डेकॅथलॉन स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी तेजस्विन शंकरचेही अभिनंदन केले. तेजस्विन शंकरने सर्व दहा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट, अष्टपैलू कामगिरी केली असे त्यांनी म्हटले आहे. त्याच्या या यशाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी म्हटले की, “भारतीय खेळाडू सातत्याने इतिहास घडवत आहेत, देशाला त्याचा अभिमान आहे. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 'डेकॅथलॉन' स्पर्धेत तेजस्विन शंकरने कांस्यपदक जिंकले आहे. त्याने स्पर्धेच्या सर्वच्या सर्व, दहा फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट आणि अष्टपैलू कामगिरी केली. त्याचे अभिनंदन. त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande