
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2026” अंतर्गत लातूर, नांदेड, धाराशिव व बीड या चार जिल्ह्यांतील 61 हजार 216 कर्जखात्यांना एकूण 462 कोटी 81 लाख रुपयांचा लाभ वितरित करण्यात आला असल्याची माहिती सहकार विभागाचे लातूर विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली.
यामध्ये लातूर जिल्ह्यात 22 हजार 963 खात्यांना 159.95 कोटी, नांदेडमध्ये 12 हजार 929 खात्यांना 106.24 कोटी, धाराशिवमध्ये 12 हजार 214 खात्यांना 105.86 कोटी तर बीड जिल्ह्यात 13 हजार 110 खात्यांना 90.74 कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.राज्यस्तरावर 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,028 कोटी रुपये थेट जमा झाले असून, मराठवाडा विभागात एकूण 1 लाख 30 हजार 934 खात्यांना 932.60 कोटींचा लाभ वितरित झाला आहे.राज्यातील 53 बँकांनी सुमारे 32 लाख कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी 16.96 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली असून 6 ऑगस्ट अखेर 12.10 लाख खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या खात्यातही रक्कम जमा केली जाणार आहे. खरीप पीक कर्ज तातडीने वितरित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या असल्याचेही श्री. चव्हाण म्हणाले.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis