सोलापुरात रिक्षा चालकांच्या गैरप्रकारांविरोधात तक्रार निवारण यंत्रणा
सोलापूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : सोलापूर शहर व परिसरातील प्रवाशांनी ऑटो रिक्षा प्रवासादरम्यान चालकांकडून होणाऱ्या अवाजवी भाडे आकारणी, प्रवासास नकार अथवा गैरवर्तणुकीच्या तक्रारी तात्काळ नोंदवाव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांच्या व
सोलापुरात रिक्षा चालकांच्या गैरप्रकारांविरोधात तक्रार निवारण यंत्रणा


सोलापूर, १० ऑगस्ट (हिं.स.) : सोलापूर शहर व परिसरातील प्रवाशांनी ऑटो रिक्षा प्रवासादरम्यान चालकांकडून होणाऱ्या अवाजवी भाडे आकारणी, प्रवासास नकार अथवा गैरवर्तणुकीच्या तक्रारी तात्काळ नोंदवाव्यात, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नियमानुसार निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे मागणे, प्रवाशांना इच्छित ठिकाणी नेण्यास नकार देणे तसेच प्रवाशांशी असभ्य वर्तन करणे, अशा प्रकारच्या तक्रारींच्या निवारणासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

तक्रार करताना वाहन क्रमांकासह घटनेचा तपशील द्या

प्रवाशांनी तक्रार नोंदविताना संबंधित रिक्षाचा वाहन क्रमांक, घटनेची वेळ, ठिकाण आणि घटनेचा संपूर्ण तपशील देणे आवश्यक आहे. तक्रारीसाठी पुढील अधिकृत संपर्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत :

ई-मेल : mh13@mahatranscom.in / dyrto.13-mh@gov.in

दूरध्वनी : ०२१७-२३०३०९९

मोबाईल : ९४२०५६४५१३

प्रवाशांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन संबंधित प्रकरणाची पडताळणी करण्यात येणार आहे. तक्रार तथ्यपूर्ण आढळल्यास संबंधित रिक्षाचालकावर मोटार वाहन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सोलापूर शहर व परिसरातील रिक्षा प्रवाशांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना बळी पडल्यास उपलब्ध तक्रार निवारण यंत्रणेचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी केले आहे.------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande