
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। नशामुक्त भारत अभियानाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त 18 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालये तसेच शासकीय व अनुदानित वसतिगृहांतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय व्यसनमुक्तीची शपथ घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी नशामुक्ती मित्र म्हणून नोंदणी करावी. नोंदणीसाठी http://nashamukt.dasje.gov.in/nashamukti-mitr या संकेतस्थळाला भेट द्यावी.तसेच केंद्र शासनाच्या अधिकृत ई-शपथ संकेतस्थळावर http://nashamukt.dasje.gov.in/pledge वर जाऊन व्यसनमुक्तीची शपथ घ्यावी. अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून शपथेचे प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis