
छत्रपती संभाजीनगर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।तिरंगा यात्रेच्या नियोजनासाठी भाजपा कामगार मोर्चा छत्रपती संभाजीनगर शहर कार्यकारिणीची बैठक भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या उपस्थितीत संपन्न झाली भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, छत्रपती संभाजीनगर शहर कार्यकारिणीची ‘तिरंगा यात्रा’च्या पार्श्वभूमीवर बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात भव्य ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तसेच नियोजनाचा आढावा घेण्यात आला.राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीचा अभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची भावना मनामनात रुजविणाऱ्या या भव्य तिरंगा यात्रेत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis