
छत्रपती संभाजीनगर, १० ऑगस्ट (हिं.स.) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर, या प्रकरणावर महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे उपाध्यक्ष संजय तायडे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मनोज जरांगे पाटील यांना चुकीची माहिती मिळाल्याने एकनाथ शिंदे यांच्याबाबत गैरसमज निर्माण झाला असून, त्यातूनच त्यांनी आरोप केल्याचे तायडे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात कोणतीही बैठक घेण्यात आलेली नसल्याचा दावा करत तायडे पाटील यांनी बैठकीबाबत गैरसमज निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. केवळ गैरसमजामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना संजय तायडे पाटील यांनी हे स्पष्टीकरण दिले. जरांगे पाटील यांना चुकीची माहिती देण्यात आली असून, त्यातून गैरसमज निर्माण झाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती समोर आल्यानंतर गैरसमज दूर होण्याची शक्यता असल्याचे तायडे पाटील यांनी सांगितले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis