विद्युत सुरक्षा दररोजच्या कामाचा भाग झाली पाहिजे : राजेंद्र पवार
कोल्हापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। विजेची कामे करताना वीज कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. विद्युत सुरक्षा हा दररोजच्या कामाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे आणि तशी कार्यसंस्कृती महावितरण मध्ये तयार करण्याचा प्रशासनाचा उद्देश असून, वीज
महावितरण मानव संसाधन विभागाची आढावा बैठक


कोल्हापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। विजेची कामे करताना वीज कर्मचाऱ्यांनी सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक आहे. विद्युत सुरक्षा हा दररोजच्या कामाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे आणि तशी कार्यसंस्कृती महावितरण मध्ये तयार करण्याचा प्रशासनाचा उद्देश असून, वीज कर्मचाऱ्यांनी प्रत्येक आठवड्याची सुरुवात (सोमवारी) 'सुरक्षा प्रतिज्ञा' घेऊनच करावी असे आवाहन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी आज (दि. १०) कोल्हापूर येथे केले.

महावितरणच्या कोल्हापूर परिमंडलातील ‘ऊर्जा शक्ती’ सभागृहामध्ये संचालक (मासं) राजेंद्र पवार यांनी मानव संसाधन विभागाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी संचालक (मासं) राजेंद्र पवार यांनी सर्व वीज कर्मचाऱ्यांना या बैठकीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुरक्षा साधनांचे वाटप करण्यात आले.

यावेळी महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता गणपत लटपटे, सहायक महाव्यवस्थापक (मासं) शशीकांत पाटील, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर, कार्यकारी अभियंते सुनिल गवळी, म्हसू मिसाळ, अभिजीत सिकनीस, दत्तात्रय भणगे, विजयकुमार आडके, अजित अस्वले, वैभव गोंदील, संजय पोवार, नितीन पळसुलेदेसाई, निलेश चालीकवार व निरज आहूजा, समन्वयक डॉ. संतोष पटणी यांच्यासह अभियंते, मानव संसाधन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना संचालक राजेंद्र पवार म्हणाले, शून्य अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येकाने दैनंदिन विजेची कामे करताना सुरक्षेची उपाययोजना केली पाहिजे. सुरक्षेच्या नियमांना कधीही बगल देऊ नका. वीज कोणालाच क्षमा करत नाही, त्यामुळे प्रत्येक कामात सुरक्षा साधनांचा वापर अत्यंत आवश्यक आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन, उत्तम सुविधा आणि कल्याणकारी योजना राबवून त्यांची काळजी घेते. याच भावनेतून कर्मचाऱ्यांनी देखील ग्राहकांची काळजी घ्यावी, त्यांना तत्पर सेवा द्यावी, ग्राहकांशी संवाद साधताना गोड बोलावे आणि व्यसनांपासून दूर राहावे. कर्मचाऱ्यांच्या कामावरच कंपनीची जनमानसांतील प्रतिमा अवलंबून असते, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी प्रभारी मुख्य अभियंता गणपत लटपटे म्हणाले, ‘’यापूर्वी स्थानिक पातळीवर सुरक्षा साधने उपलब्ध केली जात होती, ज्यामध्ये एकसारखेपणा नव्हता. मात्र, आता कंपनीचे मुख्य कार्यालय एकाच वेळी राज्यातील वीज कर्मचाऱ्यांसाठी उत्तम दर्जाची सुरक्षा साधने पुरवत असून, या संपूर्ण प्रक्रियेची नोंद ऑनलाईन प्रणालीत होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande