‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होत आष्टीत आ. सुरेश धस यांनी फडकविला तिरंगा
बीड, १० ऑगस्ट (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रव्यापी अभियानात सहभागी होत बीड जिल्ह्यातील आष्टी येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्या ‘अद्वैतचंद्र निवास’स्थानी अभिमानाने त
अ


बीड, १० ऑगस्ट (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रव्यापी अभियानात सहभागी होत बीड जिल्ह्यातील आष्टी येथे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्या ‘अद्वैतचंद्र निवास’स्थानी अभिमानाने तिरंगा फडकविण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, हा केवळ ध्वजवंदनाचा क्षण नसून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला, शौर्याला आणि समर्पणाला वाहिलेली आदरांजली आहे.

तिरंगा हा केवळ एक ध्वज नसून तो देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय स्वाभिमानाचे जिवंत प्रतीक आहे. प्रत्येक नागरिकाने राष्ट्रप्रेमाची भावना मनात जपत ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार धस यांनी केले.

आपल्या घरावर तिरंगा फडकवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या स्तुत्य संकल्पनेला बळ द्यावे आणि राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande