‘हर घर तिरंगा’ अभियानातून राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होवो - श्रीजया चव्हाण
नांदेड, 10 ऑगस्ट (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या मंत्राला पुढे नेत, आज भोकर मतदारसंघाच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आयोजित भव्य तिरंगा यात्रेचा भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री जया अशोक चव्हाण यांनी शुभारंभ
अ


नांदेड, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या मंत्राला पुढे नेत, आज भोकर मतदारसंघाच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आयोजित भव्य तिरंगा यात्रेचा भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री जया अशोक चव्हाण यांनी शुभारंभ करून यात्रेत सहभागी झाल्या.

हातात डौलाने फडकणारा तिरंगा, ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला. या यात्रेत नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय आणि शंकरराव चव्हाण महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.

तिरंगा हा केवळ आपल्या देशाचा ध्वज नाही, तर आपल्या स्वातंत्र्याचा, एकतेचा आणि राष्ट्राभिमानाचा अभिमान आहे. ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरात आणि प्रत्येक मनात राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ होवो, हीच भावना! असल्याचे आमदार चव्हाण म्हणाल्या

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande