राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई आणि प्रभावी जनजागृती करा : हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)| राष्ट्राची अस्मिता असलेला राष्ट्रध्वज १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी अनेकजण विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; परंतु कार्यक्रमानंतर तेच ध्वज रस्त्यांवर, कचर्यात अथवा नाल्यांमध्ये फाटलेल्या-फुटलेल्या अवस्थेत आढळतात.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन


कोल्हापूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)| राष्ट्राची अस्मिता असलेला राष्ट्रध्वज १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी अनेकजण विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; परंतु कार्यक्रमानंतर तेच ध्वज रस्त्यांवर, कचर्यात अथवा नाल्यांमध्ये फाटलेल्या-फुटलेल्या अवस्थेत आढळतात. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. तिची सुनावणी करतांना माननीय न्यायालयाने प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजांद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी राज्य शासनास आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आहेत. सध्या देशभरात ‘सिंगल युज प्लास्टिक’वर पूर्णपणे बंदी असल्याने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांचे उत्पादन आणि विक्री करणे हा कायदेशीर गुन्हा ठरतो. तरी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्रशासनाने आवश्यक कायदेशीर कारवाई करून प्रभावी जनजागृती करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांना देण्यात आले.

या निवेदनात केलेल्या मागण्या मध्ये शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी. जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी. सर्वच शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत याचा समावेश आहे.

या प्रसंगी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर उपस्थित होते. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, भाजपचे महेश जाधव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे रामभाऊ मेथे, ‘महाराज प्रतिष्ठान’चे संस्थापक निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे कार्यप्रमुख योगेश केरकर, मंदिर महासंघाचे अशोक गुरव, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, अखिल भारत हिंदू महासभेच्या पूजा शिंदे, शाहीर धोंडीराम मगदूम, हिंदू जागरणच्या सहजिल्हा संयोजक डॉ. अश्विनी माळकर, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी आणि दीपक कातवरे उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande