परभणीत गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी निमित्त व्याख्यान व पुरस्कार वितरण समारंभ
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त कै. दत्तराव रौंदळे व कै. गंगाबाई दत्तराव रौंदळे स्मृती व्याख्यानमाला व पुरस्कार वितरण समारंभ गुरुवारी (दि.१३) आयोजित करण्यात आला असून विद्याभारतीच्या अखिल भारतीय मंत्री डॉ. मध
अ


परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथीनिमित्त कै. दत्तराव रौंदळे व कै. गंगाबाई दत्तराव रौंदळे स्मृती व्याख्यानमाला व पुरस्कार वितरण समारंभ गुरुवारी (दि.१३) आयोजित करण्यात आला असून विद्याभारतीच्या अखिल भारतीय मंत्री डॉ. मधुश्री सावजी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मधुश्री सावजी या शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत अभ्यासू आणि जाणकार आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागातील आरटीई समितीच्या अशासकीय सदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाच्या सदस्य, भोसला मिलिटरी स्कूल नाशिकच्या विश्वस्त, विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानच्या विश्वस्त यासह अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या असून त्यांच्या या कार्याविषयी देशभरातील अनेक संस्थांकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विशेषतः राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या विषयावर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत.

व्याख्यानमाला व गौरव पुरस्कार समारंभाचे हे चौथे वर्ष आहे. दरवर्षी हा उपक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र कार्यकारी सदस्य निलेशजी गद्रे यांचे यावेळी अहिल्यादेवींचे जीवन कार्य या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परभणी विभागाचे संघचालक डॉ. रामेश्वर नाईक हे राहणार आहेत. हा कार्यक्रम वसमत रस्त्यावरील श्री. शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात गुरुवारी (दि.१३)सायंकाळी सहा वाजता होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकिशन रौंदळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande