
छत्रपती संभाजीनगर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। वृत्तपत्र विकणाऱ्या आर्यनला उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे आमदार अंबादास दानवेंकडून सायकल भेट देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर नयेथील गसेननगर येथील इयत्ता सहावीचा विद्यार्थी आर्यन गौतम गायकवाड प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असून, कुटुंबाला हातभार लावण्यासाठी दररोज वृत्तपत्र विक्री करतो. भागीरथीबाई उच्च माध्यमिक शाळेत शिकणारा आर्यन पाऊस, थंडी आणि उन्हाची पर्वा न करता वृत्तपत्रे विकतो.
आर्यन क्रांती चौक येथील मातृभूमी प्रतिष्ठान कार्यालयातही नियमितपणे वृत्तपत्रे देतो. त्याची मेहनत आणि जिद्द पाहून आमदार अंबादास दानवे यांनी त्याला सायकल भेट दिली. वृत्तपत्र विक्रीसाठी होणारा त्याचा प्रवास सायकलमुळे सुकर होऊन वेळ आणि श्रम वाचतील, तसेच त्याच्या शिक्षणाला मदत होईल, या उद्देशाने ही मदत करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis