
परभणी, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश विटेकर यांच्या उपस्थितीत
मानवत शहर व तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी व सूचना जाणून घेण्यासाठी आज पंचायत समिती सभागृह, मानवत येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी नागरिकांनी विविध शासकीय विभागांशी संबंधित समस्या व अडचणी मांडल्या. प्रत्येक नागरिकाची समस्या समजून घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्नांची तातडीने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या.
जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होत असून, प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत होत आहे. नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक व तत्परतेने कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी देण्यात आल्या.
जनतेच्या समस्या ऐकून घेणे, त्यावर तत्काळ कार्यवाही करणे आणि शासनाच्या योजना व सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवणे, यासाठी जनता दरबार हे प्रभावी माध्यम ठरत आहे. नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर असून, जनतेच्या सेवेसाठी कायम कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगितले.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण, तहसीलदार श्री. मोचेवाद, जि.प.सदस्य दत्तराव जाधव, सभापती विष्णुपंत निर्वाळ, उपनगराध्यक्ष डॉ.अंकुश लाड, उपसभापती सुरज काकडे, यांच्यासह मानवत तालुक्यातील सर्व पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक नागरिक यांच्यासह महसूल, आरोग्य व इतर विभागातील अधिकारी कर्मचारी, लाभधारक व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis