
बीड, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
अनुष्ठानाच्या तयारीसाठी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी डॉ. सुरेश चौधरी यांची निवड
श्रावण मासानिमित्त श्री ष.ब्र.१०८ निळकंठ शिवाचार्य महाराज, गदगेश्वर हिरेमठ, जिल्हा गुलबर्गा (कर्नाटक), रंभापुरी पीठ यांच्या मौन तपोअनुष्ठानाच्या आयोजनाच्या तयारीसंदर्भात बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत अनुष्ठानाच्या नियोजनासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. सुरेशआप्पा चौधरी यांची निवड करण्यात आली. परळी येथील श्री संत गुरुलिंग स्वामी मंदिर (बेलवाडी) येथे ही बैठक पार पडली.
दिनांक १३/८/२०२६ (गुरुवार) ते ११/९/२०२६ (शुक्रवार) या कालावधीत होणाऱ्या अनुष्ठानामध्ये सकाळी पारायण, दुपारी आरती व शिवाचार्य महाराजांचे दर्शन, प्रसाद वाटप व भजन होणार आहे. पहिल्या दिवशी वैद्यनाथ मंदिरापासून श्री संत गुरुलिंग स्वामी मठ, बेलवाडी पर्यंत वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे.
श्रावणमास अनुष्ठान समितीच्या कार्यकारिणीत अध्यक्ष डॉ. सुरेशआप्पा चौधरी, उपाध्यक्ष शिवकुमार केदारी व योगेश मेनकुदळे, सचिव नितीन समशेट्टी, सहसचिव सोमनाथ गोपनपाळे, कार्याध्यक्ष विकास हालगे आणि कोषाध्यक्ष अशोक नावंदे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून गिरीश चौधरी, महादेव ईटके, श्याम बुद्रे, रमेश चौंडे, अश्विन मोगरकर, अनिल आष्टेकर, प्रकाश खोत, दत्तात्रेय गोपनपाळे, महेश निर्मळे, चेतन सौंदळे, सुशील हरंगुळे, सचिन स्वामी, मनोज संकाये, नागेश हालगे, बंडू नाना कोरे, रमाकांत गुजर, संजय कोरे, उमाकांत पोपडे व नरेश पिंपळे यांचा समावेश आहे.
मार्गदर्शक म्हणून दत्तापा ईटके, सोमनाथआप्पा हालगे, विजयकुमार मेनकुदळे, चंद्रकांतआप्पा समशेट्टी, त्रिंबकआप्पा काटकर, महादेवआप्पा फडकरी, महादेवआप्पा उमरदंड, संजय खाकरे व दयानंद स्वामी यांची निवड करण्यात आली आहे.
महिला समितीत गोदावरीताई चौधरी, उमाताई समशेट्टी, सुरेखाताई मेनकुदळे, सरोजिनीताई हालगे, श्रद्धाताई हालगे, आशाताई कापसे, विमलताई हरंगुळे व मनीषाताई चौंडे यांचा समावेश आहे. प्रसिद्धीप्रमुख म्हणून संतोष जुजगर यांची निवड करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis