नांदेड-इंदरजितसिंग बावरीच्या खून प्रकरणात पाच जण पोलिसांच्या ताब्यात
नांदेड, 10 ऑगस्ट (हिं.स.)नांदेड सिडको भागात एका युवकाचा खून केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या सक्षम मार्गदर्शनात पोलिसांनी एक महिला आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालकास पाच आरोपीना ताब्यात घेतले आहे. इतरांचा शोध सुरु आहे. नांदेड ग्रामीण
Q


नांदेड, 10 ऑगस्ट (हिं.स.)नांदेड सिडको भागात एका युवकाचा खून केल्या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या सक्षम मार्गदर्शनात पोलिसांनी एक महिला आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालकास पाच आरोपीना ताब्यात घेतले आहे. इतरांचा शोध सुरु आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संत गाडगेबाबा सोसायटी, जुना कौठा येथील इंदरजितसिंग बलजितसिंग बावरी (वय २५) यांचा खून करण्यात आला. इंदरजितसिंग व त्यांचे चुलत भाऊ फायनान्सचे कामानिमित्त धनेगाव येथील पेट्रोल पंपावर गेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. पूर्वीच्या वादातून खंजराने वार करून इंदरजितसिंग यांचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मृत व फिर्यादी यांनी आठ दिवसांपूर्वी हिंगोली गेट येथून हप्ते थकीत असलेली बजाज पल्सर-२२० मोटारसायकल एजन्सीच्या सांगण्यावरून ताब्यात घेऊन एजन्सीच्या यार्डमध्ये जमा केली होती. यामुळे संबंधित आरोपींच्या मनात राग निर्माण झाला होता. त्यातून पूर्वनियोजित कट रचून हा खून केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणात एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande