बीड - पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन
बीड, 10 ऑगस्ट (हिं.स.)। पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे भारतीय जनता पक्षाचे नेते अक्षय मुंदडा यांनी उद्घाटन केले. यावेळी उपस्थित पशुपालक, शेतकरी तसेच युवक-युवतींशी संवाद साधत दुग्ध
बीड - पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन


बीड, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे भारतीय जनता पक्षाचे नेते अक्षय मुंदडा यांनी उद्घाटन केले.

यावेळी उपस्थित पशुपालक, शेतकरी तसेच युवक-युवतींशी संवाद साधत दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन आणि वराहपालन यांसारख्या पूरक व्यवसायांच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्याबाबत संवाद अक्षय मुंदडा यांनी साधला.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पशुपालन व्यवसायाला आधुनिकतेची जोड देणे आणि पशुधनाच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम करणे, हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश आहे.शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती आणि पशुधनाचा विकास यासाठी असे प्रशिक्षण उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास यानिमित्ताने व्यक्त केला.

याप्रसंगी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व पशुपालक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande