स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेवर ‘ऑपरेशन अलर्ट’
जयपूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही घुसखोरी, तस्करी किंवा अन्य गैरप्रकारांची शक्यता लक्षात घेऊन भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारपासून विशेष ‘ऑपरेशन अलर्ट’
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सीमेवर ‘ऑपरेशन अलर्ट’


जयपूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेपलीकडून होणाऱ्या कोणत्याही घुसखोरी, तस्करी किंवा अन्य गैरप्रकारांची शक्यता लक्षात घेऊन भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारपासून विशेष ‘ऑपरेशन अलर्ट’ सुरू केले आहे. जैसलमेरला लागून असलेल्या सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.

17 ऑगस्टपर्यंत सुरू राहणाऱ्या या रणनीतिक अभियानाचा मुख्य उद्देश स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणे हा आहे. वाळवंटी भागातील तीव्र उष्णता आणि थारच्या धुळीच्या वादळांनाही न जुमानता जवानांचे मनोबल उंचावलेले आहे.

सीमा सुरक्षा दलाने कालवे आणि वाळूच्या टेकड्यांनी वेढलेल्या आपल्या सीमावर्ती चौक्यांवरील जवानांची संख्या दुप्पट केली आहे. पारंपरिक पद्धतीने उंटांवरून केली जाणारी गस्त सुरू ठेवतानाच पायदळ गस्तीमध्येही मोठी वाढ करण्यात आली आहे.रात्रीच्या वेळी सीमेपलीकडील हालचालींवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी नाइट व्हिजन उपकरणे, हँड-हेल्ड थर्मल इमेजर तसेच अत्याधुनिक ड्रोन डिटेक्शन सिस्टिमचा वापर केला जात आहे. वरिष्ठ अधिकारी स्वतः सीमावर्ती भागांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. सीमेवर 24 तास कडक निगराणी ठेवली जात आहे.

या अभियानांतर्गत केवळ शून्य रेषेवरच नव्हे, तर सीमेच्या लगत असलेल्या गावांमध्येही सतर्कता वाढवण्यात आली आहे. जिल्हा पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधून विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सीमावर्ती भागात ये-जा करणाऱ्या संशयास्पद वाहनांची आणि व्यक्तींची कसून तपासणी केली जात आहे. सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि सरपंचांशी संवाद साधून कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा अनोळखी व्यक्ती आढळल्यास तातडीने सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande