हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध
बीड, १० ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजलगाव, वडवणी आणि
अ


बीड, १० ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यांत निषेध आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात माजलगाव, वडवणी आणि धारूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. तहसील कार्यालयांसमोर उपस्थित राहून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयसिंग धैर्यशील सोळंके यांनी महिलांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करत सार्वजनिक जीवनात जबाबदारीने वक्तव्य केले गेले पाहिजे, अशी भूमिका मांडली.

“महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि सार्वजनिक जीवनात जबाबदारीने वक्तव्य केले गेले पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे,” असे जयसिंग धैर्यशील सोळंके यांनी सांगितले.

दरम्यान, आंदोलनादरम्यान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधित वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande