स्वातंत्र्यदिनी रॉबिनहूड आर्मी देणार लातूरच्या ५ गावांतील गरजूंना अन्नधान्याचे किट
लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही रॉबिनहूड आर्मीच्या वतीने हासेगाव, खुंटेगाव, सेलू, पाखरसांगवी, बुधडा या पाच गावातील गरजू परिवारापर्यंत प्रत्येकी १८ किलो वजनाचे अन्नधान्याचे किट वाटप केले जाणार असल्याची माहिती रॉबिनहूड आर्मीच्य
रॉबिनहूड आर्मी


लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही रॉबिनहूड आर्मीच्या वतीने हासेगाव, खुंटेगाव, सेलू, पाखरसांगवी, बुधडा या पाच गावातील गरजू परिवारापर्यंत प्रत्येकी १८ किलो वजनाचे अन्नधान्याचे किट वाटप केले जाणार असल्याची माहिती रॉबिनहूड आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी लातुरात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमासाठी समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी दि. १२ ऑगस्ट पर्यंत गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी अशा वस्तूं देणगी स्वरूपात आर्मीच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत

पोहोचाव्या, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या पत्रकार परिषेदत रॉबिनहूड आर्मीच्या डॉ. उर्वी नागुरे, नंदन भुतडा, डॉ. संगमेश येवणगे यांची प्रमुख उपस्थिती होती. मागच्या दहा वर्षांपासून रॉबिनहूड आर्मी या सामाजिक संघटनेने समाजातील दीनदुबळ्या, गरीब, ज्यांना दोनवेळच्या अन्नाची भ्रांत आहे अशा असंख्य नागरिकांना समाजातील विविध स्तरातून अन्न संकलित करून त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande