
छत्रपती संभाजीनगर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
छत्रपती संभाजी नगरचे माजी खासदार एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना शुभेच्छा देताना लोटालोटी,नगरसेवकाला मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे
इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सिडको एन-१२ येथील मन्नत बंगल्यासमोर कार्यकर्ते, एमआयएमचे नगरसेवक आणि हितचिंतकांची मोठी गर्दी झाली होती. शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये लोटालोट सुरू झाली. त्यातून धक्काबुक्की झाली आणि काही वेळातच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी एमआयएमच्या एका नगरसेवकाला मारहाण केली असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्रकरण अधिक चिघळू नये म्हणून इम्तियाज जलील यांनी स्वतः मध्यस्थी केली. त्यांनी कार्यकर्ते आणि नगरसेवकांमध्ये झालेला वाद मिटवून परिस्थिती शांत केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis