लातूर जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढली; अनेकांचा पक्षप्रवेश
लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन लातूर जिल्ह्यातील विविध भागांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात शिवसेना जि
शिवसेनेत प्रवेश


लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याने प्रभावित होऊन लातूर जिल्ह्यातील विविध भागांतील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. लातूर येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते हा प्रवेश झाला.

देवणी येथील देविदास लक्ष्मण कांबळे, बंडाप्पा होनमाने तसेच शिरोळ, वांजरवाडा परिसरातील शिवाजीराव मोरे, सविता जाधव, कमल गोडबोले, पल्लवी रासुरे, सविता ऐतनबोणे, सत्यकला मोरे, कलावती मलकापूरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने म्हणाले की, एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. महिला, शेतकरी, कष्टकरी, सुशिक्षित बेरोजगार, कर्मचारी तसेच युवक-युवतींसाठी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यभरातून विविध क्षेत्रांतील नागरिक शिवसेनेशी जोडले जात आहेत.

लातूर जिल्ह्यातही शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन माने यांनी केले. ‘गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’ या संकल्पनेनुसार पक्षाची बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनपूर्वक कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे काम करताना कोणत्याही कार्यकर्त्याला अडचण आल्यास जिल्हाप्रमुख म्हणून आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाहीही माने यांनी दिली. आगामी काळात लातूर जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सरचिटणीस व्यंकटराव बिराजदार, शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे, व्यापारी आघाडी सेनेचे जिल्हाध्यक्ष बसवराज मंगरुळे, निलंगा विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा प्रमुख सोमनाथ स्वामी, अधिवक्ता वर्षाताई शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande