
अमरावती, 10 ऑगस्ट (हिं.स.)।
शहरातील अर्जुन नगरच्या जिजाऊ कॉलनी परिसरातील निलंबीत पटवारी विपुल भानुदास ठाकरे यांच्या घरावर दोन अज्ञात आरोपींनी रविवारी रात्री उशिरा गोळ्या झाडल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना परिसरातील सिसीटीव्हीत कैदझाली आहे.
गाडगेनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीतअर्जुन नगर परिसरात रविवारी रात्री ९-३० वाजताच्या सुमारास घडली. यावेळी घरात पत्नी शीतल ठाकरे, त्यांचा भाऊ आणि दोन मुले होती. अचानक घरासमोर फायरींगचा आवाज आल्याने खळबळ उडाली. शितल ठाकरे यांनी त्वरीत पोलिस कंट्रोल रुमला फोनकरुन माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार, दोन बुर्काधारी आरोपींनी मोटरसायकलवर येऊन ठाकरे यांच्या घराच्या दिशेने फायरिंग केली. पहिल्याराऊंडनंतर आरोपीने दुसऱ्यांदा फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुसऱ्यांदा फायरींग होऊ शकली नाही. फायरिंगनंतर दोघेही आरोपी पसार झाले. घटनेनंतर एका मिनिटाने दोन्ही आरोपी पुन्हा ठाकरे यांच्याघरासमोर पोहचले. यावेळीमागे बसलेला आरोपी खाली उतरला आणि मुख्य गेटजवळ आला. त्याने बंदुकीने दुसऱ्यांदा फायर केले. नंतर दोघेही पळून केले. ही घटना काही मिनिटाच्या आत घडली. परंतु यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले.
अंगण, रस्त्यात मिळाले कारतूसचे खोके
पोलिसांना घटनास्थळी एक खोका घरासमोर आंगणात आणि दुसरा घराच्या बाहेर रस्त्यावर सापडला. प्रकरणाचे गांभीर्य पाहता फॉरेन्सीक टीमला पाचारण करण्यात आले. पेलिस आयुक्त राकेश ओला यांचयसह वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले. शहरातील तिनही पोलिस आयुक्त तसेचक्राइम ब्रांचटीमने घटनास्थळाचेनिरिक्षणकेले. सिसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवून आरोपींचा शोध घेण्यास सुरवात केली आहे.
सुनावणीच्या एक दिवस आधी फायरिंग
अवैध शस्त्रप्रकरणी विपुल ठाकरे याच्या जामिनावर १० ऑगस्टला न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु सुनावणीच्या एक दिवस आधी म्हणजे रविवारी रात्री त्याच्या घरावर फायरिंग करण्यात आली. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. आरोपींचा विपुलठाकरेशी काय संबंध आहे, या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. पथ्रोट पोलिस ठाण्यात अवैश शस्त्रप्रकरणी विपुल ठाकरेचे नाव आले होते. आरोपी अनिकेत रविंद्र महाजन याच्याजवळून एक देशी कट्टा, दोन मॅगझीन, तिन जिवंत काडतूस सापडले होते. त्याने सांगितले होते की, हे शस्त्र त्याने विपुल ठाक रेजवळून घेतले आहेत.------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी