सर्पदंश झालेल्या ११ वर्षीय दीपिकाला हेलिकॉप्टरने नागपूरला हलविले
गडचिरोली, १० ऑगस्ट (हिं.स.) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी (वय ११ वर्षे) हिला पुढील उपचारांसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने एअरलिफ्ट करून हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील शासकीय वैद्य
सर्पदंशाने गंभीर विद्यार्थ्यांनीला ऐरलिफ्ट


गडचिरोली, १० ऑगस्ट (हिं.स.) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी (वय ११ वर्षे) हिला पुढील उपचारांसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने एअरलिफ्ट करून हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले आहे.

दीपिकावर प्राथमिक उपचार सुरू असताना तिच्या प्रकृतीचा विचार करून अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने तिला नागपूर येथे संदर्भित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने तातडीने आवश्यक समन्वय साधत हेलिकॉप्टरची व्यवस्था केली.

यानंतर दीपिकाला एअरलिफ्ट करून नागपूर येथे पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तिच्यावर आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने उपलब्ध व्हावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने नागपूर येथील संबंधित वैद्यकीय यंत्रणेशीही समन्वय साधला आहे.

दीपिकाच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, तिच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तिच्या प्रकृतीबाबत आवश्यक ती माहिती घेतली जात आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande