
छत्रपती संभाजीनगर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जनसंपर्क कार्यालयास सदिच्छा भेट दिली. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी त्यांचे स्वागत केले
यावेळी संघटनात्मक विषयांसह आगामी काळातील पक्षाच्या विविध उपक्रमांबाबत तसेच जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक परिस्थितीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. पक्षसंघटना अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी आवश्यक नियोजन आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनसेवेची व्याप्ती वाढविण्याबाबतही विचारविनिमय झाला. याप्रसंगी मंत्री अतुली सावे, आमदार. सुहास शिरसाट, संयोजक नितीन काळे, सहसंयोज. राहुल लोणीकर तसेच प्रदेश उपाध्यक्ष चैतन्य बापू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वाटचालीला अधिक बळ देत, जनसेवेचा संकल्प घेऊन आपण सर्वजण एकजुटीने पुढे वाटचाल करूया! असे आवाहन यावेळी करण्यात आले---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis