ट्रायकडून सेवा आणि व्यवहार कॉल्ससाठी १६०१ सिरीजची अंमलबजावणी
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सोमवारी युटिलिटी, कुरिअर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कंपन्यांसाठी सेवा आणि व्यवहार कॉल्सकरिता १६०१ सिरीज क्रमांकांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू केली आहे. वित्तीय आणि इ
TRAI 1601 SERIES IMPLEMENTATION


नवी दिल्ली, 10 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) सोमवारी युटिलिटी, कुरिअर आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील कंपन्यांसाठी सेवा आणि व्यवहार कॉल्सकरिता १६०१ सिरीज क्रमांकांची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू केली आहे. वित्तीय आणि इतर सेवा कॉल्समधील गोंधळ टाळण्यासाठी, ही प्रणाली बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्र आणि सरकारी संस्थांसाठी आधीच लागू केलेल्या १६०० सिरीजपेक्षा वेगळी असेल.

ट्रायने म्हटले आहे की, बीएफएसआय क्षेत्रात १६०० सिरीजच्या व्यापक वापरामुळे मिळालेल्या अनुभवाच्या आधारावर, ही विश्वसनीय क्रमांक प्रणाली आता इतर क्षेत्रांमध्ये लागू केली जात आहे. पहिल्या टप्प्यात वीज, पाणी, गॅस आणि एलपीजी वितरण यांसारख्या युटिलिटी सेवा, तसेच कुरिअर आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांचा समावेश आहे.निर्देशानुसार, दूरसंचार सेवा प्रदात्यांनी ९० दिवसांच्या आत पात्र संस्थांची नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. हे क्रमांक कोणत्याही मध्यस्थ किंवा एग्रीगेटरला न देता थेट पात्र संस्थांना दिले जातील. हे क्रमांक केवळ सेवा आणि व्यवहारांसाठीच्या कॉल्ससाठी वापरले जातील, प्रचारात्मक कॉल्ससाठी नाही.

ट्रायने म्हटले आहे की, या व्यवस्थेमुळे अशा फसवणूक करणाऱ्यांना आळा बसेल, जे अधिकृत कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवून सामान्य १०-अंकी क्रमांकांचा वापर करून ग्राहकांची दिशाभूल करतात. वेगळ्या क्रमांकांमुळे ग्राहकांना खरे सेवा कॉल्स ओळखणे सोपे होईल आणि विश्वास अधिक दृढ होईल.

------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande