राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमः लातूरात ६५ बालकांची 'टू-डी इको' तपासणी
लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)। जन्मतः हृदयाचा आजार असलेल्या ६२ बालकांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ''टू-डी इको'' तपासणी करण्यात आली. त्यात ४० बालकांना हृदयाशी संबंधित आजार असल्याने निष्पन्न झाले. त्या पैकी १५ बालकांवर पुण्यातील रुग्णालय
बालकांना मिळणार आरोग्यसेवा


लातूर, 10 ऑगस्ट (हिं.स.)।

जन्मतः हृदयाचा आजार असलेल्या ६२ बालकांची राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 'टू-डी इको' तपासणी करण्यात आली. त्यात ४० बालकांना हृदयाशी संबंधित आजार असल्याने निष्पन्न झाले. त्या पैकी १५ बालकांवर पुण्यातील रुग्णालयांत मोफत शत्रक्रिया करण्यात येणार आ हे.

राष्ट्रीय बाल कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यात हृदयाशी संबंधित आजार आढळलेल्या बालकांची टू-डी इको तपासणी जिल्हाधिकारी डॉ. भारत बाष्टटेवाड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयरोग तज्ञ डॉ. बजरंग दुबे यांच्या रुग्णालयात करण्यात आली. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुजाता पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक सारडा डॉ. आनंद कलमे यांच्या नेतृत्वाखाली बालकांच्या तपासणीचे नियोजन करण्यात आलेले होते.

पुण्यातील बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज सुगावकर, लातुरातील हदयरोगतज्ज्ञ डॉ. बजरंग दुबे यांनी या शिबिरात ६२ बालकांची टू डी इको तपासणी करून उपचाराची दिशा निश्चित केली आहे. 'आरबीएसके' मुळे वेळीच आजारांचे निदान होत असून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांत (आरबीएसके) ० ते १८ वयोगटातील मुलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात ३० आरोग्य पथकांमार्फत अंगणवाडी व शाळेतील मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. जन्मजात व्यंग, पौषण कमतरता आणि इतर आजारांचे वेळेवर निदान केले जाते. या वयोगटातील सर्व मुलांवर मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया शासनामार्फत मोफत केले जातात. आरबीएसके अंतर्गत हृदयरोग तपासणी, नेत्ररोग, फेफरे अशा आजारांसंदर्भात शिबिर घेऊन उपचार केले जातात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande