
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)।मराठी भाषा विभाग आणि त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या सात संकेतस्थळांचे महाराष्ट्र शासनाच्या मानक ‘maharashtra.gov.in’ डोमेनवर यशस्वीपणे हस्तांतरण करण्यात आले आहे. हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व संकेतस्थळे नव्या पत्त्यांवर नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली आहेत.
मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, विश्वकोश प्रथमावृत्ती (१ ते २० खंड) आणि मराठी परिभाषा कोश या सात संकेतस्थळांचे महाआयटीमार्फत हस्तांतरण करण्यात आले.
हस्तांतरण प्रक्रियेदरम्यान आवश्यक तांत्रिक आणि प्रणालीगत बदल करण्यात आल्याने काही काळ संबंधित संकेतस्थळे तात्पुरती अनुपलब्ध होती. मात्र, ही प्रक्रिया आता पूर्ण झाली असून सर्व संकेतस्थळे नव्या शासकीय डोमेनवर उपलब्ध झाली आहेत.
नवीन संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत :
- मराठी भाषा विभाग: marathi.maharashtra.gov.in
- भाषा संचालनालय: directorate-marathi.maharashtra.gov.in
- राज्य मराठी विकास संस्था: rmvs-marathi.maharashtra.gov.in
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ: sahitya-marathi.maharashtra.gov.in
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ: marathivishwakosh.maharashtra.gov.in
- विश्वकोश प्रथमावृत्ती (१ ते २० खंड): vishwakosh-marathi.maharashtra.gov.in
- मराठी परिभाषा कोश: shabdakosh-marathi.maharashtra.gov.in
नागरिक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी, साहित्यिक, साहित्यप्रेमी तसेच शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यापुढे संबंधित सेवांसाठी या नव्या संकेतस्थळांचा वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु