पुण्यात बेशिस्त पार्किंगला लगाम; ‘पे अँड पार्क’ योजनेच्या अंमलबजावणीची तयारी
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील अरुंद रस्ते आणि दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्यातच वाहन पार्किंगबाबत महापालिकेचे ठोस धोरण नसल्याने रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी केली
Pay park


पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील अरुंद रस्ते आणि दिवसेंदिवस वाढत असलेली वाहनांची संख्या यामुळे गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. त्यातच वाहन पार्किंगबाबत महापालिकेचे ठोस धोरण नसल्याने रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. या पार्श्वभूमीवर बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी प्रस्तावित ‘पे अँड पार्क’ योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने महापालिका प्रशासनाने पाऊल टाकले आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रस्ता आणि विमानतळ रस्त्यावर ‘पे अँड पार्क’ योजना लागू करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली ही योजना प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना २०१८मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवर ‘नो पार्किंग, नो हॉल्टिंग’ तसेच काही मर्यादित भागांत ‘पे अँड पार्क’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नाही. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेला ठराव पुढील निर्णयासाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. मात्र, त्यावर राज्य सरकारकडून निर्णय झाला नाही. आता सर्वसाधारण सभेची मान्यता असल्याने महापालिका प्रशासनाने या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील वाढती वाहतूक आणि पार्किंगची समस्या लक्षात घेता प्रमुख रस्त्यांवर नियोजित पद्धतीने वाहनतळ उपलब्ध करून देणे आणि रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगला आळा घालणे, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे.

---------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande