पुणे- दुबार मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळणार
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत (एसआयआर) मतदार यादीतील एखादी नोंद वगळण्यात येणार असल्यास संबंधित मतदाराला हरकत घेण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी मतदारांना अर्ज क्रमांक ७ भरावा लागणार असून, संबंधित मतदाराची
पुणे- दुबार मतदारांची नावे प्रारूप यादीतून वगळणार


पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत (एसआयआर) मतदार यादीतील एखादी नोंद वगळण्यात येणार असल्यास संबंधित मतदाराला हरकत घेण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी मतदारांना अर्ज क्रमांक ७ भरावा लागणार असून, संबंधित मतदाराची सुनावणी घेतल्यानंतरच नोंद वगळण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान एकापेक्षा अधिक ठिकाणी नाव असलेल्या दुबार मतदारांची नावेही प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदार यादीतील नोंद वगळण्यापूर्वी संबंधितांना हरकत नोंदविण्याची संधी मिळणार आहे.

राज्यात एसआयआरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, रविवारपर्यंत ९८ टक्के मतदारांपर्यंत गणना अर्ज पोहोचले आहेत. त्यापैकी ७७ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. पुणे जिल्ह्यात ९५ टक्क्यांहून अधिक गणना अर्जांचे वाटप करण्यात आले आहे. त्यापैकी ६५.१४ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित अर्जांचे डिजिटायझेशन आणि पुढील प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. एसआयआरच्या पुढील टप्प्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नावे वगळण्यासंदर्भात हरकती आणि दावे दाखल करण्याची संधी मतदारांना मिळणार आहे. त्यामुळे मतदारांनी आपले नाव मतदार यादीत कायम आहे की नाही, याची खात्री करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande