स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन
पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नूतनीकरणाचा लाभ घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक
स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन


पुणे, 10 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नूतनीकरणाचा लाभ घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता नूतनीकरण अर्जाची ऑनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.

पुढील शैक्षणिक वर्षात योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह १५ सप्टेंबर २०२६पर्यंत ऑनलाइन नूतनीकरण अर्ज साद करावा. अर्ज संबंधित अधिकृत पोर्टलवर भरता येणार आहे. अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी सर्व माहिती अचूकपणे नमूद करावी. आवश्यक कागदपत्रे स्पष्ट आणि पूर्ण स्वरूपात अपलोड करून अर्ज अंतिम करण्यापूर्वी सर्व तपशीलांची खात्री करावी. अपूर्ण किंवा त्रुटीपूर्ण अर्ज साद करू नयेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे. तसेच, सर्व महाविद्यालयांनी त्यांच्या संस्थेतील स्वाधार योजनेसाठी पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना नूतनीकरण अर्ज प्रक्रियेची तातडीने माहिती द्यावी. विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज साद करावेत, यासाठी आवश्यक सूचना देण्याचे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande